Sugarcane Crushing : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऊस गाळप हंगाम २०२६-२७ चे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. ९ सप्टेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मंत्री समितीची बैठक झाली. यावेळी यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. यामुळे साखर उतारा कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मागील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आला होता. पण साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा (२०२६-२७) गाळप हंगाम लवकर सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने तगादा लावला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गाळप हंगाम लवकर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील ऊस उपलब्धता, गाळप हंगामाचे नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना देण्यात येणारा ऊस दर तसेच साखर कारखान्यांसमोरील विविध आर्थिक व तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यात आली. याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताच्या दृष्टीने समतोल साधून आगामी गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. Sugarcane Crushing
परंतु, आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी च्या साखर आयुक्त यांच्या पत्रांनुसार राज्यातील सर्व सहकारी व खाजगी करखान्या ना 15 ऑक्टोबर किंवा त्या पूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. Sugarcane Crushing

